जो दृढ अभ्यास करतो, तोच ब्रह्मात एकरूप होतो
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – याचा दृढ निश्चयानें जे अभ्यास करतात, ते खात्रीनें ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हें आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. 🌺 जो कोणी ‘अभ्यास’ – म्हणजे आत्मध्यानाचा, योगाचा – सातत्याने, श्रद्धेने आणि निश्चयाने करतो, त्याला नक्कीच ब्रह्मत्व प्राप्त होते. आणि हे…












