QOTD: Which author inspires you the most? ▫️ आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. - पु. ल. ▫️ कोऱ्या कागदावर जणु काही मिडासचा जादूचा स्पर्श असावा अशी लेखणी असणारे आपले लाडके लेखक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे म्हणजेच 'पु. लं. देशपांडे' अर्थातच 'भाई' यांचा आज 100 वा वाढदिवस. भाईंचे नाव अजुनही लोकांच्या मनांत चिरतरुण आहे. कधी कधी काही व्यक्ती अश्या असतात की आपण ज्यांना पहिले नसले तरी त्यांच्या शब्दांतुन आपसूकच ते ओळखीचे वाटू लागतात. ज्यांच्या मार्मिक लिखाणाने अनेकांना जगण्याची दिशा व विनोदी शैलीने अनेकांच्या आयुष्यात आनंदरुपी लहर आली व येत राहील असे हे भाई. लोकांना त्यांच्या शब्दांतुन खळखळून हसवणारे असे हे भाई. ज्यांच्या शब्दरूपी वर्णनांतून व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर हुबहूब उभे राहतात, अश्या ' व्यक्ती आणि वल्ली ' चे लेखक म्हणजेच भाई. फक्त लेखकच नव्हे तर वादन, संगीत, अभिनय, दिग्दर्शन अश्या एक नव्हे तर अनेक भूमिका चोखपणे बजावणारे असे हे आपले आदरणीय पु .लं. महाराष्ट्रभूषण पुरुषोत्तम वामनराव देशमुख यांना विनम्र अभिवादन.🙏🌼 ▫️▫️▫️ #puladeshpande #books #puladeshpandequotes #marathi #marathiwritings #blogger #igbooks #booksofinstagram #unitedbookstagram #igreads #bookstagramindia #mumbai #reader #booklover #spiderplant #bookishpost #readersofinstagram #mumbaibookstagram #thelittlepumpkin12 https://www.instagram.com/p/B4mNEbrgnIh/?igshid=2zx4evypl0qc